हिवरखेड : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा बीए व बीकॉम फायनल परीक्षेत शंभर टक्के निकाल
हिवरखेड: जनोपचार न्यूज नेटवर्क -स्थानिक कला आणि वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड या महाविद्यालयाचा निकाल बीए व बीकॉम फायनल या परीक्षेत शंभर टक्के लागलेला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2025 मध्ये घेतल्या गेलेल्या या परीक्षांमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत यामध्ये बीए फायनल चे 85% विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर बीकॉम फायनल या परीक्षेचे 42% विद्यार्थी प्रथम श्रेणी त उत्तीर्ण झालेले असून बाकीचे सर्व विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत हे या ठिकाणी विशेष उल्लेखनीय नियमित वर्ग अध्ययन अध्यापनाचे कार्य ग्रंथालय समृद्ध व्यवस्था शिस्तबद्ध अध्यापन व अध्यापक वारंवार घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा यामुळे विद्यार्थी हा परीक्षार्थी चांगल्या पद्धतीने झाला व त्यांना हे अपूर्व यश प्राप्त झाले.. विद्यार्थ्यांच्या या अपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भोसले प्राध्यापक डॉक्टर अरुण हागे प्राध्यापक डॉक्टर अरुण तायडे व सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे महाविद्यालयाची उज्वल परंपरा राखण्यात यश मिळाल्याबद्दल महाविद्यालयाची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश ठाकरे उपाध्यक्ष रामदास तिडके सचिव कैलास दादा तिडके यांनी प्राचार्य डॉक्टर आनंद भोसले यांचे अभिनंदन केले आहे विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महाविद्यालयाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत व त्यांना दिलेले मार्गदर्शन व स्वतः विद्यार्थ्यांनी केलेली परीक्षेची तयारी यांचाच हे यश आहे असे विनम्रतेने प्राचार्य आनंद भोसले यांनी सांगितले आहे

إرسال تعليق