लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी
लहुजी विद्रोही सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
खामगाव-जनोपचार न्यूज नेटवर्क :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी लहुजी बिद्रोही सेनेच्या बतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत लहुजी विद्रोही सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार यांच्या नेतृत्वाखाली खामगाव एसडीओ यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातून तसेच सर्व जिल्हयातून निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. ज्यांच्या लेखणीने व बोलीने लाखो बंचित कष्टकरी, शोषीत दलीतांना जगण्याचे नवे स्वप्ने दिले असे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बुलढाणा जिल्हयात एक अनोखी सामाजिक चळवळ उभी राहत आहे. येणाऱ्या १ ऑगष्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गंध समाजाच्या कणाकणात भिनलेला आहे. त्यांची जयंती म्हणजेच समाज प्रबोधनाचा व सत्याच्या लढ्याचा एक मोठा सोहळा आहे. या दिवशी जिल्हयातील शासकिय व निमशासकिय अधिकारी कर्मचारी सुध्दा या कार्यक्रमात व जयंती मध्ये सहभागी व्हावेत म्हणून जिल्हयात सार्वजनिक सुटी जाहीर करावी. जिल्हयातील जनतेसाठी व मातंग समाजासाठी ही केवळ सुटी नसुन सामाजिक परीवर्तनाच्या विचारांचा दिला जाणारा मानाचा मुजरा आहे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सार्वजनिक सुटी मिळाली तर सर्व समाज बांधव व जनतेला नवी दिशा च आशा मिळेल, तरी १ ऑगष्ट २०२५ पासून जिल्ह्यात साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शासकिय सुटी जाहीर करावी. अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अनेकांच्या सह्या आहेत.


إرسال تعليق