अधिवेशनात जंगली रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्याला राष्ट्रवादीने पाठवले ताशपत्ते
कृषी मंत्री अक्कल शून्य माणूस- तालुकाध्यक्ष संजय बगाडे
खामगांव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- विधान भवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात जंगली रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) 21 जुलै रोजी ताशपत्ते पाठवित जाहीर निषेध केला. तसेच कृषिमंत्री अक्कल शून्य माणूस असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर केली.
महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना तारण्यासाठी खर तर महाराष्ट्रात वर्षातून 3 अधिवेशन होतात त्यातील पावसाळी अधिवेशन हे मुंबई मध्ये घेण्यात येते. दरम्यान पावसाळी अधिवेशन मुंबईच्या विधान भवनात सुरू असतांना अतिशय महत्त्वाचा विषयावर चर्चा सुरू असतांना राज्याचे कृषी मंत्री चक्क जंगलीरम्मी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पहावयास मिळाली. राज्यातील शेतकरी संकटात असतांना शेतकऱ्यांच्या अडी अडचणी व समस्यावर चर्चा न करता चक्क विधान भवनात सुरू असलेल्या अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जंगली रम्मी खेळतांना आढळून आले त्यामुळे शेतकऱ्यांविषयी हे कृषी मंत्री किती संवेदनशील आहेत हे दिसून आले त्या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री यांना चक्क ताशपत्ते पोष्टाने पाठविण्यात आले असून विधान भवनात पत्ते न खेळता आपल्या घरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्ते खेळावे यासाठी हे ताशपत्ते पाठविण्यात आले आहे. कृषी मंत्री कोकाटे हा अक्कल शून्य माणूस असल्याचं बोलत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी त्या बेअक्कल कृषी मंत्र्याला पदावरून कमी करावे अशी मागणी आंदोलन करते वेळी केली आहे. यावेळी संतोष पेसोडे, रामा कोकरे, उमेश बाभूळकर, मोहन पाटील, सज्जतखान मियां खान, महादेव ढगे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment