खामगांव शहरातील शासकीय विश्राम गृह येथे केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांनी शिवसेना व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी,तसेचनागरिक व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.संवादाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.व शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले.स्थानिक संस्थेवर भगवा फडकण्याकरिता ताकतीनिशी कामाला लागण्याचे सूचना दिल्या संघटन कसे वाढवायचे याच्यावर सुद्धा सखोल मार्गदर्शन केले.

Post a Comment