लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या खामगावात भव्य रक्तदान शिबिर
खामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्याचे यशस्वी लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 22 जुलै रोजी खामगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ यांचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी अनावश्यक खर्च न करता समाजपयोगी कार्यक्रम घेऊन नागरिकांची सेवा करावी असे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे. त्या अनुषंगाने खामगावात उद्या भव्य रक्तदान शिबिर व इतर समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक 22 जुलै रोजी उपजिल्हा शासकीय रुग्णालय खामगांव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबराच्या नियोजन व यशसवितेसाठी आज भाजपा कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे कामगार मंत्री ना. अँड आकाश फुंडकर, जेष्ठ साहित्यिक राम दादा मोहिते, भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, भाजपा खामगांव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, खामगाव शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा, युवा मोर्चा खामगाव मतदार संघ संयोजक ,माजी नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर, जानवी ताई कुलकर्णी शिवानी ताई कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्तिथी होती. यावेळी खामगाव मतदार संघातील प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. भव्य रक्तदान शिबिरासह शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच प्रत्येक गावात रुक्षारोपण आणि इतर समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी या रक्तदान शिबीर व इतर आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाज हित जोपसावे असे आवाहन ना. अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.


Post a Comment