वाडी येथील मंगेश कळसकर च्या आत्महत्ते ला महिला चा जाच कारणीभूत! महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क तालुक्यात वाडी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाने एका महिलेच्या जाचाला कंटाळून पूर्णा नदी पात्रात आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांनी नोंदविली. 46 वर्षीय महिलेने वाडी येथील 24 वर्षीय मंगेश प्रकाश कळसकार (24 ) या मुलाला खोट्या प्रेमा च्या फास्यात अडकून तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार देतो असे म्हणून पैश्याची मागणी केली .गेल्या अनेक दिवसापासून ही महिला मंगेश कळसकार याला मानसिक व शारीरिक त्रास देत होती .खोट्या गुन्हात अडकितो अशी धमकीव पैसे मागण्याच्या त्रासाने मंगेश कळसकार यांने पूर्णा च्या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मृतक मंगेश च्या वडिलांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या महिले विरूद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे.

Post a Comment