रात्री बारा वाजता व्यवसायिकाला लुटण्याचा प्रयत्न
स्कुटीवर आले होते दोन अज्ञात आणि म्हणाले रुकsss रुकss !
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्कुटी वर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी व्यवसायिकाला रुक रुक म्हणत अडीच लाखावर कॅश असलेली बॅग हिस्कवण्याचा प्रयत्न केला. ही घटना 20 जुलै च्या रात्री बारा वाजून 15 मिनिटांनी सुरुची पान जवळ घडली. घटनेबाबत बंदूकधारी इसमाने हा प्रयत्न केल्याचे चर्चा होती मात्र तक्रारीमध्ये काहीतरी वस्तू काढत असल्याचा उल्लेख असल्याने बंदूकधार्या ची चर्चा थांबली.
🔵 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सोहन गोपालदास चौधरी वय 42 वर्ष व्यवसाय-व्यापार रा. बारादारी अशोक गेस्ट हाऊस जवळ खामगांव हे नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान बंद करुन दुकानातील 2,82,500/-रु कॅश मोजुन अॅक्टीवा गाडी MH-28 BU-6070 ने घरी जात असतांनान सुरुची पान नावाच्या दुकानासमोर एका पांढऱ्या रंगाचे स्कुटीवर दोन अनोळखी इसमांनी चौधरी यांना रुक रुक असा आवाज दिल्याने ते थांबले . दरम्यान स्कुटीवर मागे बसलेला इसम याने खिशातुन काहीतरी काढत चौधरी यांच्या जवळ येऊन पैश्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्कुटी चालविणाऱ्या इसमाने अंगात पाढरे शर्ट, मागे बसलेल्या इसमाने डार्क कलरचे शर्ट घातलेले होते व दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. अशीच तक्रार सोहम चौधरी यांनी शहर पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि मुळीक करीत आहेत
![]() |
| Advt. |


Post a Comment