नॅशनल हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
माजी विद्यार्थ्यांनी केली एकवीस वटवृक्षांची लागवड
खामगाव ( जनोपचार न्यूज नेटवर्क) येथील शहरालगतच्या व घाटपूरी तथा खुटपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लेकुरवाडी, नंदाखोरा व जाफ्राबादी टेकडीवर गेल्याअनेक दिवसापासून वृक्षारोपण व बीजारोपन मोठ्या उत्साहात सुरू असून आज दि.२० जुलै रविवार रोजी कलाध्यापक संजय गुरव यांच्या मार्गदर्शनात श्री.अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी पाच ते सात फूट उंचीचे २१ वटवृक्ष लागवड करून आपल्या बालपणी शाळेत वृक्ष संवर्धनाच्या झालेल्या संस्कारांची आठवण कायम ठेवून कलाध्यापक संजय गुरव यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनातून वटवृक्ष लागवड केल्याचे समाधान व्यक्त केले.
वटवृक्ष गुटीकलमाचे माध्यमातून हे पाच ते सात फुट उंच वटवृक्ष घरीच तयार करून डोंगरावर लावत असल्याची माहिती व पध्दतीवर सर्पमित्र विजय खंडागळे यांनी विषद करून वटवृक्षाचे मानवीजीवनात महत्त्व वृक्षमित्र उमेश खेडकर व निखिल हिवरखेडे यांनी सांगितले.
वरील उपक्रमास खर्च रूपये शुन्य असून या उपक्रमातील प्रत्येक सदस्य आपल्याच घरी वृक्ष बालतरू निर्मिती करतात व स्वतःच डोंगरावर खड्डे खोदून वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी घेतात.अशाच प्रकारे बीज संकलन करून काटेरी झुडपात बीजारोपन हा उपक्रम याच वेळी राबविण्यात आला असून असंख्य देशीवृक्ष बीज रोपण करण्यात आले.वरील उपक्रमास वैभव कारंजकर, दिनेश उखडकर, संदीप फंदाट, गणेश कोकाटे, संतोष डवले, संजय गुरव, विजय खंडागळे, निखिल हिवरखेडे, उमेश खेडकर आदींनी अथक परिश्रम घेऊन वृक्षारोपण यशस्वी केले.


Post a Comment