सह्याद्री अर्बन व सहाय्यक निबंधक खामगांव यांच्या संयुक्तवतीने निबंध लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण

भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यांना मदतीसाठी सह्याद्री अर्बन पाठीशी - भगवान बरडे 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सप्ताह २०२५ व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिना निमित्त सह्याद्री अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी व सहाय्यक निबंधक सरकारी संस्था खामगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०६/०७/२०२५ वार रविवार रोजी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध लेखन स्पर्धेचा विषय -देशाच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीची भूमीका असून स्पर्धे मध्ये ३०० हून जास्त विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. सदर निबंध लेखन स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळा दि.०८/०७/२०२५ रोजी संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र चव्हाण (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलढाणा). तर प्रमुख पाहुणे रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी, खामगांव), प्रदीप पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी), शुखदास गारोळे. (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खामगांव), विजयजी ठाकरे. (तालुका लेखा परीक्षक खामगां, जनार्धन हेंड पाटील, राजेशजी झापडे. भगवानराव बरडे (अध्यक्ष, सह्याद्री अर्बन, शरदभाऊ वसतकार (उपाअध्यक्ष, सह्याद्री अर्बन)यांची उपस्थिती लाभली यावेळी विजेत्यांना सन्मानपत्र व बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक निबंधक गारोळे यांनी केले तर सूत्रसंचालन धीरज देशमुख यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष भगवानराव बरडे यांनी सह्याद्री अर्बन ने केलेल्या प्रगती बद्दल माहिती सांगितली तसेच तरुण मुलांनी सहकार चळवळी मध्ये भाग घ्यावा व उज्जवल भविष्य बनवावे अशा शुभेच्छा दिल्या. भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यांना मदतीसाठी सह्याद्री अर्बन पाठीशी राहील असे आश्वासन दिले. या वेळी कार्यक्रमासाठी खालील कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Post a Comment

Previous Post Next Post