एलसीबीची "थर्ड आय" घाटाखाली कार्यान्वित..
नांदुऱ्यात घरगुती वापरातील 24 गॅस सिलेंडरसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बुलढाणा एलसीबीचा चार्ज घेताच निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक गोपनीय माहिती त्यांना मिळतात. लोणार नंतर आता घाटाखाली म्हणजेच नांदुरा येथेही त्यांच्या पथकाने जबरदस्त कारवाई केली आहे. या कारवाई २४ घरगुती वापरातील गॅस सिलेंडर कॉम्प्रेसर मशीन व इतर साहित्य असा एकूण एक लाख पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
![]() |
| कार्यवाही पथक:- Psi अविनाश जायभाये,HC राजेंद्र टेकाळे,HC सतीश मुळे, HC अनुपकुमार मेहेर,LHC वनिता शिंगणे,NPC विजय वारुळे,NPC अरविंद (बंटी) बडगे,Pc मंगेश सनगाळे |
मिळालेल्या माहितीनुसार शेख मोबिन शेख हनीफ रा. मोबीनपुरा नांदुरा हा अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉम्प्रेसर मशिन चे साह्याने घरगुती /कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा मधील टाकीमध्ये भरताना एलसीबीच्या पथकाने छापा टाकला व त्याला रंग हात पकडले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक निलेश तांबे , अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव, उपविपोअ खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांचे आदेशाने दिनांक 11/07/2025 रोजी पो. स्टे. नांदुरा हद्दीत इसम नामे शेख मोबिन शेख हनीफ रा. मोबीनपुरा नांदुरा जि.बुलढाणा यांनी अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉम्प्रेसर मशिन चे साह्याने घरगुती /कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा मधील टाकीमध्ये भरताना समक्ष मिळून आला. नमूद इसम याचे ताब्यातून एकूण इंडेन कंपनीचे 24 गॅस सिलेंडर , ऑटो रिक्षा, कॉम्प्रेसर मशीन व इतर मुद्देमाल मिळून आल्याने पुढील कायदेशीर कारवाई करिता मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाहीस्तव पो.स्टे. नांदुरा यांचे ताब्यात देण्यात आले . याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्ह दाखल केला आहे .

Post a Comment