अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन शाखा खामगांवच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क :- अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन, खामगांव तर्फे श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये २२ गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य म्हणजे मुलांना शिक्षणाकडे प्रोत्साहीत करणे आणि त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करून त्यांना आत्मविश्वास प्रदान करणे हा होता.
यावेळी अध्यक्ष देवेंद्र सपना मुणोत, सचिव नरेश किरण चोपडा, कोषाध्यक्ष विरेंद्र डिंपल शहा, उपाध्यक्ष राजीव मीनल शहा, सौ. शितल पुजा नहार, अध्यक्ष समीर रिध्दी संचेती, डॉ. अमीत सोनल ओसवाल, संजय जया छल्लानी व इतर मान्यवर संदीप भारती शहा, संजय अलका जैन, संदेश प्रिया झांबड, रजनिश प्रार्थना लुणावत, हितेश चेतन झांबड, नितीन भावना खिलोशीया, मितेश नेहा कमाणी, अंकुर सोनम विकमसी, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नंदा उदरपूरकर मॅडम व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. या कार्याचे मुख्य दाते चिरंजीव सिध्दार्थ मनोज चोपडा यांनी त्यांची उदारता दाखविली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यास महत्वाची भूमिका बजावली. यावेळी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment