अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यात यावी या मागणीकरीता मनसेचे उद्या न.प.समोर एकदिवसीय धरणे आंदोलन
अतिक्रमणधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - गायगोळ
खामगाव ः मागील काही दिवसापुर्वी खामगाव शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी शहरातील अतिक्रमणधारकांच्या दुकानांवर बुल्डोजर चालविण्यात आला होता. त्यामध्ये अनेक अतिक्रमणधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. व ज्या भागातून सदरचे अतिक्रमण काढण्यात आले. तिथे तार कंपाउड करण्यात आल्याने अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ आल्याने शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना त्यांच्या जुन्या जागेवरच गाळे/ दुकाने अल्पदरात बनवून द्यावे किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी यासह अतिक्रमणधारकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कारवाईमुळे गरीब अतिक्रमण धारकांवर अन्याय झाला असून, ही माेहिम भेदभावपुर्ण राबविल्या गेल्याचा आरोप मनसेने लावला आहे. अनेकांना अद्यापही आपल्या व्यवसायाला पर्यायी जागा मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच अजूनही शहरात काही भागात अतिक्रमण मोहिम सुरुच आहे. परंतु, श्रीमंताचे अतिक्रमण जैसे थे अजूनही दिसत आहे. त्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या जुलमी कारभाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी तसेच आपल्याला हक्काची पर्यायी जागा मिळावी या मागणीकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या एकदिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने अतिक्रमणधारकांनी सहभागी व्हावे. असे आव्हान मनसेचे शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर केले आहे.

Post a Comment