माहेश्वरी समाजाच्या वतीने ब्रज चौरासी कोस मानसी परिक्रमा
माहेश्वरी वरिष्ठ महिला प्रकोष्ठ, माहेश्वरी बहु-बेटी मंडल व माहेश्वरी युवक मंडल यांचा संयुक्त उपक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ;- पवित्र श्रवण मासाच्या पर्वावर माहेश्वरी वरीष्ठ महिला प्रकोष्ठ माहेश्वरी बहु-बेटी मंडल व माहेश्वरी युवक मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि २०/०७/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक श्री हरि लॉन्स खामगांव या ठिकाणी' ब्रज चौरासी कोस मानसी परिक्रमा' या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. चौरासी कोस जवळपास २५२ किलोमीटर ब्रज क्षेत्र ही ती भूमी आहे.
ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या बालपणाच्या व किशोर अवस्था च्या लिला केल्या. जसे गोवर्धन लिला, रास लिला, माखण चोरी, बंस वद्य इत्यादी या यात्रेत वृन्दावन, मथुरा, गोवर्धन, गोकुल, नंदगांव, बरसाना, रावल, बलदेव, व महावत मानसी चा अर्थ मनोगावे करणे. प्रत्येक मनुष्याला वरिलप्रमाणे ८४ कोस ची प्रदक्षिणा शारीरिक रुपाने करणे शक्य नाही म्हणुन सर्व शहर बांधवासाठी करण्यात आले. सदरहू प्रदक्षिणा वृन्दावन येथील पु. शंकुलतला दिदी कोठारी यांच्या मुखावृंदातून पार पडली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने अखिल भारतवर्षिय माहेश्वरी महिला संगठणाच्या राष्ट्रीय महामंत्री श्रीमती ज्योती राठी रायपुर, महिला संगठणाच्या पुर्व राष्ट्रीया अध्यक्षा श्रीमती शोभा सादाणी कोलकत्ता, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठणाच्या प्रदेश अध्यक्षा श्रीमती सुषमाताई बंग नागपुर तसेच विशेष अतिथी म्हणुन मध्यांचल च्या निवृत्तमान संयुक्त मंत्री श्रीमती उषा करवा, अमरावती संस्कार सिध्दा समिती सह्यभारी मध्यांचल श्रीमती ज्योती बाहेती अकोला व बिहाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ संगीता बिहाणी भुसावली व वि.प्रा.मा. संगठनाचे उपाध्यक्ष कमल माहेश्वरी या देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमात कुठलेही मंच नाही, स्वागत समारंभ नाही, लांब लचक भाषणे नव्हते. वेळेवर सर्व नियोजित कार्यक्रम पार पडलीत व शहराच्या इतिहासात प्रथमच स्थानिक स्तराच्या कार्यक्रमासाठी समाजाच्या शिर्ष स्तरावरील कार्यरत म्हणजे अ.भा.मा. महासभा, प्रदेश संगठन राष्ट्रीय युवा संगठनच्या वतीने अग्रीम शुभकामना मिळाल्या होत्या. आयोजकाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले होते की, लहान मुलांसाठी खेळण्याकरीता अस्थाई खेळण्याचे झोन सुध्दा बनविण्यात आले होते व भगवान श्रीकृष्णाचे हिंडोला दर्शन व ५६ भोग हे वैशिष्ट पूर्ण होते. खामगांव शहरातील माहेश्वरी समाजाच्या सर्व विवाहित बहिणी व मुली यांना आयोजकाच्या वतीने निमंत्रीत करण्यात आले होते व सुमारे २७५ विवाहित मुली व बहिणी आपल्या सासुरवाडी हुन फक्त या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहिल्या. त्यांच्या या उपस्थितीमुळे शहराच्या सामाजिक इतिहासात एक अमूर्तपुर्व नोंद झाली. कार्यक्रमाच्या शेवटी वृन्दावन येथील प्रसिध्द भागवताचार्ये आचार्य मनिष कृष्णा शामी महाराज यांनी सुध्दा कार्यक्रमाचे स्वरूप पाहुन स्वतः उपस्थित राहुन समाज बांधवाना आर्शिवचन दिले. या कार्यक्रमाचे दुपारी ३ वाजेपासुन रात्री ८ वाजेपर्यंत प्रसंगा अनुरुप कृष्ण लिले मध्ये शहरातील जवळपास १५० समाज बहिणी व मुलींनी नृत्य सादर करून शहराला वृन्दावन व गोकुळाचे स्वरूप प्राप्त करुन दिले. खामगांव शहरात आपली अविस्मरणीय छाप सोडुन गेलेल्या या कार्यक्रमाला जवळपास १५०० समाज बांधवाची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता माहेश्वरी वरिष्ठ महिला प्रकोष्ठ, माहेश्वरी बहु बेटी मंडळ, माहेश्वरी युवक मंडल च्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले व शहर स्तरावर कार्यरत सर्व सामाजिक संस्थेनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रत्त्यक्ष अप्रत्यक्ष रुपात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानले आहे.




Post a Comment