वारकऱ्यांची वारी सुखकर होण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार...

नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाला निवेदन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :श्री संत गजानन महाराज पालखीचे खामगांव येथे प्रस्थान होत आहे. शहरतील रस्ते व साफसफाई पाहता नगरपालिकेने  त्वरित करावी असे निवेदन आज काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आले. तसेच एक निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असून शेगाव कडे प्रस्थान होण्या पुर्वी पर्यायी मार्गाची म्हणजे शेलोडी,तिंत्रव,जवळा,या मार्गाची डागडुजी करण्या बाबत.तसेच पालखी च्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शोचालय व टॉयलेट ची व्यवस्था करण्यात यावी अशी निवेदन देण्यात आले. यावेळी स्वप्निल संजय ठाकरे शहर अध्यक्ष व किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष खामगांव शहर काँग्रेस कमिटी खामगांव आदींची उपस्थिती होती.



या निवेदनात नमूद आहे की  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात येणार आहे.आपल्या शेगाव येथील श्री संत गजनान महाराज संस्थांनच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असुन ह्या पालखीचे आपल्या खामगांव शहरात दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी आगमन होणार आहे.खामगांव येथे एक दिवसाचा मुक्काम करुण ही पालखी दुसऱ्या दिवशी शेगाव कडे प्रस्थान करणार असुन या वेळेस पालखी सोबत लाखो भाविक शेगाव कडे मुख्य मार्गाने जात असतात या मुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक शेगाव कडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा म्हणजे शेलोडी,तींत्रव,जवळा या मार्गाचा वापर करित असतात अश्या वेळेस आपण या पर्यायी मार्गाच्या रस्त्यांची परिस्थीती पाहिल्यास ह्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली असुन या रस्त्यात ठीक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडुन त्यात पाणी साचुन कुठे डबके तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे.या मुळे दर्शनास जाणाऱ्या व दर्शन करुण येणाऱ्या भक्तांना खुप त्रास होईल हा त्रास दुर करण्या करिता शेलोडी,तींत्रव,जवळा,शेगाव कडे जाणाऱ्या या पर्यायी मार्गाची तत्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच शेगाव कडे जाणाऱ्या पालखीच्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शौचालय व टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी.तरी आपण अमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी.



Post a Comment

Previous Post Next Post