टिळक राष्ट्रीय विद्यालयात जमला माजी विद्यार्थ्यांचा मुकुंद मेळा
२००३ दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात
खामगाव-भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मुकुंद मेळा रंगला होता. या विद्यालयात नुकताच २००३ च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन सोहळा उत्सवात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २२ वर्षांनी एक दिवस पुन्हा विद्यार्थी म्हणून जगला.
शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असते. विद्यार्थी दशेत घडणारे संस्कार माणसाला आयुष्यभर उपयोगी ठरत असतात. त्यामुळे शाळा प्रत्येकाच्या हृदयात कायम असते. शाळा सोडून कितीही वर्ष झाली तरी शाळेतील मित्र मैत्रिणींना भेटण्याची इच्छा असतेच. अशाच भावनेतून येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात शिकलेल्या २००३ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले आहेत. १२ जुलै रोजी सदर विद्यालयात या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा अतिशय उत्सवात पार पडला. तब्बल २२ वर्षांनी आपले जुने मित्र मैत्रिणी भेटणार या आसक्तीने शेकडो किलोमीटर अंतरावर राहणारे विद्यार्थी शाळेत आले. एकमेकांना भेटून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी एक कार्यक्रम घेऊन शाळेतील शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याप्रति सद्भावना व्यक्त केल्याच्या. या सोहळ्यानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांनी एक दिवस पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून जगण्याचा अनुभव घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला




Post a Comment