अधिकृत बांधकाम पाडणार्‍या मुख्याधिकार्‍यांकडून वसुली करा राष्ट्रवादीचे महसुल मंत्र्यांना निवेदन

 _*खामगाव, जनोपचार न्यूज नेटवर्क *_ अतिक्रमण हटाव मोहिम दरम्यान रस्ता कामात अडथळा नसणार्‍या पक्के बांधकाम पाडल्याप्रकरणी खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे या बांधकामाचा खर्च श्री शेळके यांच्या पगारातून वसुल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी महसुल मंत्री कडे केली आहे. 


याबाबत सविस्तर असे की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, 1995 च्या महायुतीच्या काळात महाराष्ट्र शासनाने झुणका भाकर योजना सुरू केली होती, त्या काळात खामगाव नगरपालिके हद्दीत ही झुणका भाकर केंद्र योजना लागू करण्यात आली होती. खामगावात भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना झुणका भाकर केंद्रासाठी जागा देण्यात आल्या होत्या. त्या जागेवर पक्के बांधकाम करुन झुणका भाकर केंद्राची स्थापना करण्यात आली होती. नगरपालिका हद्दीत खामगाव बस स्टँड समोर,नगरपालिका परिषद समोर, तहसील कार्यासमोर, अशी या प्रकारचे अनेक ठिकाणी झुणका भाकर केंद्र शासनाच्या  शासकीय जागेवर बांधण्यात आले होते .सदर झुणका भाकर केंद्र कुठलेही रहदारी अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून त्यावेळेस बांधण्यात आले होते. सदरचे बांधकाम दिनांक 28 जुन 2025 पर्यंत सुस्थितीत होते .दिनांक 28 जुन रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी , डॉ. प्रशांत शेळके यांनी अवैधरित्या कुणालाही नोटीस न देता जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर झुणका भाकर केंद्राची  पक्‍की  इमारत नेस्तनाबुत केली. अंदाजे प्रत्येकी तीन लाख  असे एकूण तीन झुणका भाकर केंद्राचे  नऊ लाख रुपयांचे त्यांनी नुकसान केले आहे. यामध्ये शासनाचे पैशाने बांधलेल्या झुणका भाकर केंद्राचे अतोनात नुकसान झालेले आहे. संबंधित मुख्याधिकार्‍यांनी त्यांचे पदाचा दुरुपयोग करून  राजकीय दबावा खाली येऊन शासकीय मालमत्तेचे फार मोठे नुकसान केले आहे, झुणका भाकर योजना बंद पडल्यामुळे तसेच  अनुदान बंद पडल्यामुळे सदरचे केंद्रातून बेरोजगार युवक चाय व नाश्ता विकून आपले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते.  त्या जागेचा आज पर्यंतचा कर भरत होते. असे असताना मुख्याधिकारींनी हिटलरशाही पद्धतीने त्या कुटुंबावर सुद्धा उपासमारीची पाळी आणलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रथमदर्शनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी दिसतात ,तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी खामगाव यांच्यावर कडक कारवाई करून शासनाच्या झालेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई त्यांच्या पगारातून करून घ्यावी व लघु व्यवसायिकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post