लायन्स क्लब खामगाव संस्कृतीद्वारा वृक्षारोपण अभियान संपन्न
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क : पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीद्वारा एक प्रशंसनीय वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. २४ जुलै २०२५ रोजी, खामगावातील तलाव रोडवरील शिवांगी बेकर्स येथे हा उपक्रम नगर परिषद खामगावच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
या अभियानांतर्गत एकूण ५१ रोपे लावण्यात आली, ज्यात पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, वड आणि इतर प्रजातींच्या वृक्षांचा समावेश होता. लावलेल्या प्रत्येक रोपाला ट्री गार्ड लावून त्याचे संरक्षण करण्यात आले, ज्यामुळे त्यांची उत्तम वाढ होण्यास मदत होईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक हिरवळ वाढवणे आणि स्वच्छ व आरोग्यपूर्ण वातावरणासाठी वृक्षांचे महत्त्व याबद्दल जनजागृती करणे हा आहे. याप्रसंगी नगर परिषद खामगावच्या वतीने श्री. प्रवीण लोंढे, सौ. ज्योती खिरोडकर मॅडम, श्री. सुनील राजपूत, श्री. सुनील सोनवणे आणि श्री. विवेक राठोड उपस्थित होते.
तसेच, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष एमजेएफ ला. आकाश अग्रवाल, सचिव ला. डॉ. निशांत मुखिया, कोषाध्यक्ष ला. सीए आशिष मोदी यांच्यासह एमजेएफ ला. अभय अग्रवाल, ला. संजय उमरकर, एमजेएफ ला. वीरेंद्र शाह, ला. उज्ज्वल गोईनका, ला. राजू थाडा, ला. योगेश शर्मा, ला. अमित गोयंका, ला. दीपक खंडेलवाल, ला. राजेंद्र सिंग बग्गा, ला. अजय अग्रवाल, ला. पियुष टिबडेवाल, ला. सौ. शिल्पा अग्रवाल, ला. सौ. दिव्या अग्रवाल आणि ला. डॉ. सोनल टिबडेवाल यांचा सह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपण मोहिमेला लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचा हातभार श्री गौरक्षण संस्थेमध्ये २५१ वृक्षांची लागवड
लांजुड, २६ जुलै २०२५ : लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने श्री गौरक्षण संस्था, लांजुड येथे, शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण २५१ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, प्रत्येक रोपाला वृक्षारक्षक (ट्री गार्ड) देखील लावण्यात आले आहेत. या उपक्रमाला खामगाव नगर परिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले.
पर्यावरण संरक्षणासाठी आणि हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लायन्स क्लब खामगाव संस्कृती नेहमीच अग्रेसर असतो. याच उद्देशाने आज श्री गौरक्षण संस्थेच्या विशाल परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे संरक्षण व्हावे यासाठी वृक्षारक्षकांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांची वाढ सुनिश्चित होईल.
याप्रसंगी लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष, सचिव , कोषाअध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर श्री गौरक्षण संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी आणि सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून उत्साहात वृक्षारोपण करून पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता दर्शविली.
या यशस्वी मोहिमेबद्दल लायन्स क्लब खामगाव संस्कृती आणि श्री गौरक्षण संस्था दोघांचेही कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुंदर व निरोगी निसर्ग तयार होतो. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयंका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment