चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्सहात
गुरु रविदास महाराज मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- गुरु रविदास महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था खामगाव च्या वतीने शालांत परीक्षेतील व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.27 जुलै रविवार रोजी अमृत इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली रोड, येथे केले गेले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष शामराव पद्मने होते तर प्रमुख वक्ता म्हणून जी एस कॉलेज खामगाव चे प्रा.डॉ. विद्याधर आठवर आणि सरस्वती महाविद्यालय पारस चे माजी प्राचार्य आर. एन.वानखडे होते, प्रमुख उपस्थिती मध्ये खामगाव शहराच्या माजी नगराध्यक्ष अनिता डवरे,. एस.ओ. शेगोकार आणि उत्तमराव पदमने मंचावर उपस्थित होते.
अध्यक्ष व मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नंतर दहावी, बारावी, नीट ,नवोदय ,इत्यादी क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिल्ट,,पुष्पगुछ ,प्रमापत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश वानखडे यांनी तर प्रास्ताविक घोपे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्याम माळवंदे यांनी केले . या कार्यक्रमाला चर्मकार समाजातील समाज बाधव व विद्यार्थी उपस्थित होते. स्नेह भोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले .

Post a Comment