अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन शाखा खामगांवच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन, खामगांव तर्फे टिळक राष्ट्रीय विद्यालयात ४२ मुलांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. गुरूकृपा ड्रेसेसचे संचालक जितेंद्र जैन आणि नितीन जैन यांच्या सहकार्याने हे सेवाकार्य शक्य झाले. याशिवाय सपना देवेंद्र मुणोत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना अन्नदान केले.
यावेळी देवेंद्र सपना मुणोत, नरेश किरण चोपडा, विरेंद्र डिंपल शहा, सौ. शितल पुजा नहार, राजीव मिनल शहा, डॉ. सचीन पल्लवी शहा, संजय जया छल्लानी, नितेश गुंजन भंसाळी, अमी अक्षय विकमसी, हितेश चेतना झांबड, गौरव मोनिका बेगानी, कमलेश कल्पना बोरा, मितेश नेहा कमाणी, निलेश भावना श्रीश्रीमल, संदीप भारती शाह सह इतर सदस्यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांची सुध्दा उपस्थिती होती. वरील माहिती मार्केट कम्युनिकेशन चेअरपर्सन संजय जया छल्लानी यांनी दिली आहे.

إرسال تعليق