श्यामल भोजनगृहाचे "निवसी मूक बधीर विद्यालयात" थाटामाटात उद्घाटन



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : निवाशी मूक बधीर विद्यालयात रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी "श्यामल भोजनगृहाचे" उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले. स्वर्गीय श्री. श्यामजी अग्रवाल आणि स्वर्गीय सौ. विमलदेवी अग्रवाल यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या या भोजनगृहाचे उद्घाटन डॉ. मधुसूदन भट्टड यांच्या शुभहस्ते झाले, तर माजी आईआरएस ऑफिसर ॲड. उज्जवल चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पीएमजेएफ लॉ आकाश अग्रवाल यांच्या प्रेरणेने आणि देणगीतून हे भोजनगृह साकार झाले आहे.


या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात विद्यालयाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष  डॉ. गोपाल सोनी, डॉ. मधुसूदन भट्टड, ॲड. उज्जवल चौहान, शिवप्रसाद पाडीया, लॉ सी एम जाधव, लॉ आकाश अग्रवाल, लॉ डॉ निशांत मुखिया, लॉ सीए आशिष मोदी, डॉ कालिदास थानवी, डॉ प्रकाश जगताप हे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पुषपगुच्छ देऊन करण्यात आले. डॉ गोपाल सोनी यांनी प्रास्ताविक भाषण केले आणि विद्यालयाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. डॉ. मधुसूदन भट्टड आणि माजी आईआरएस ऑफिसर ॲड. उज्जवल चौहान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लायन्स क्लब खामगांव संस्कृती चे अध्यक्ष लॉ आकाश अग्रवाल यांनी 'श्यामल भोजनगृहा'ची संकल्पना व स्थायी रूपे कसे पूर्ण करण्यात आले  याबद्दल माहिती दिली. तसेच लायन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे पुढे ही अशे प्रकल्प हाती घेण्यात येतील अशी हमी दिली.
या उद्घाटन सोहळ्याला मूक बधीर विद्यालयाचे सदस्य, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे सदस्य, रोटरी क्लब खामगावचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भाग्यश्री मोरखडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश जगताप सर यांनी केले. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

أحدث أقدم