श्रींच्या चरणी १ लाख मोदकांचा महानैवेद्य करणार अर्पण

श्री गजानन महाराज उपासना परिवाराचा संकल्प


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : - श्री संत गजानन महाराज पालखीच्या आगमनापित्यर्थ श्री गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगर खामगाव यांच्यातर्फे १ लाख मोदकांचा महानैवद्य अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे महानैवेद्य अर्पण सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे.

     पुणे येथील सविता निकम या भाविक महिलेने २०२२ मध्ये खामगाव येथे येऊन श्रींच्या पालखीतील वारकरी व भक्तांना मोदकाचे वितरण केले होते. बाहेरगावाहून येणारी महिला भक्त हे कार्य करू शकते तर आपण खामगाव पासून का करू शकत नाही, असा प्रश्न काही महिलांच्या मनात आला आणि आदर्श नगरातील श्री गजानन महाराज उपासना परिवाराच्या महिलांनी एकत्र येऊन मोदक वितरणात सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास २६ केंद्रावर मोदक संकलन करून त्या संपूर्ण मोदकाचे प्रसाद रुपी वाटप श्रींच्या पायी वारीत सहभागी सर्व भाविक भक्तांना खामगाव ते शेगाव या मार्गात केले जाते.  यासाठी याहीवर्षी १ लाख मोदकांचा महानैवेद्य अर्पण करण्याचा संकल्प श्री गजानन महाराज उपासना परिवाराने केला आहे. त्यासाठी यथाशक्ती कमीत कमी २१ मोदक किंवा इच्छेप्रमाणे जास्तीत जास्त मोदक देऊन योगदान करू शकता तसेच सर्व मोदक ता.२८ जुलै पर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य संकलन केंद्र आदर्श नगर, संस्कार ज्ञानपीठ जवळ बोबडे कॉलनीच्या खाली खामगाव येथे पोहोचतील अशा रीतीने पाठवावे, अधिक माहिती साठी सौ. सुवर्णा जसवंतसिंग चव्हाण, खामगाव, सौ. रुचिका चव्हाण लाखनवाडा व  ललित लवणकर रा. नागपूर यांचेसोबत संपर्क साधावा असे आवाहन श्री गजानन महाराज उपासना परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم