युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण आणि स्काऊट गाईड व कब बुलबुल दीक्षाविधी कार्यक्रम संपन्न 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये स्काऊट गाईड तसेच कब बुलबुल कार्यक्रम व दीक्षाविधी देण्यात आली संस्थाध्यक्ष गोपाल अग्रवाल शाळेचे प्राचार्य अनिरुद्ध ,कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक डॉक्टर निर्मला गजानन जाधव ,( केंद्रप्रमुख तथा प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी प. स .खामगाव) तसेच सौ मंदा तिडके प .स मांडका अद्यापिका  तथा गाईड कॅप्टन मांडका. यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

जाहिरात
सर्व मान्यवरांचे शाळेच्या शिक्षिका संगीता देशमुख मॅडम आणि पायल घडीकर मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .आज दिनांक 22 -07-2025 रोजी शाळेला स्काऊट गाईड दीक्षाविधी समारंभ निमित्ताने भेट दिली असता शाळेचे मुख्याध्यापक श्री .अनिरुद्ध अवचार सर उप प्राचार्य  अंकिता राठी मॅडम तसेच शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद व स्काऊट प्रमुख निखिल सावंग सर तसेच गाईड प्रमुख शिक्षिका प्रमुख कु कांचन लोखंडे मॅडम तसेच सौ पायल घडीनकर मॅडम हे उपस्थित होत्या शाळेमध्ये 104 युनिट ची नोंदणी आहे. निर्मला मॅडम व मंदा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रतिसाद देऊन. कृतीयुक्त पद्धतीने मराठी तसेच इंग्रजी भाषेतून गीत गायले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून प्रेरणा दिल्या त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा दीक्षाविधी कार्यक्रम घेण्यात आला . व सर्व विद्यार्थी प्रमुख पाहुणे शिक्षिका यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वचन घेतले व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला .यामध्ये शाळेत सर्व विद्यार्थ्यांचें व शिक्षकांची उत्स्फूर्तपणे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गाईडच्या प्रमुख कुमारी कांचन लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार  पाडण्यासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم