राहुल मघाडे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न  पुरस्कार जाहीर

 


      चिखली जनोपचार न्यूज नेटवर्क :- तालुक्यातील  कोलारा येथील राहुल मधुकर मघाडे हे राष्ट्रसंत प.पू.भैय्युजी महाराज प्रणित  सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळा खामगांव येथे कार्यरत असून  त्यांना नुकताच राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

     ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली यांच्या वतीने सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे नामाचा टायसन, प्रेतावरल्या भोंग्याचं जीणं, वास्तव,एक सैनिक,झुंजार पट,भाकरीची किंमत,, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, युगपूरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर, जागृतीचा विस्तव  सदैव तेवत असू द्या, अशी होती आमची सावित्री, घटनात्मक स्वतंत्र म्हणजेच प्रजासत्ताक दिवस,असे  नानाविध प्रकारचे लेख व समाजातील वास्तवावर आधारित लेखन  व सामाजिक कविता वर्तमान पत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post