कारने कुत्रीला चिरडले, 2 पिल्ले जखमी; गुन्हा दाखल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - भारधाव कारने कुत्रीला चिरडले तसेच दोन पिलांना धडक देवून जखमी केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पिपल्स फॉर ॲनिमल खामगाव संघटनेचे स्वयंसेवक रविंदरसिंध कुलदिपसिंध पोपली (45) रा. बारादरी यांनी 3 जुलै रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली की, 1 जुलै रोजी रात्री 8.30 ते 9.30 वाजताच्या दरम्यान सावजी लेआउट मध्ये एका कार चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे कार चालवुन पांढऱ्या रंगाच्या कुत्रीच्या अंगावरून कार गेल्याने कुत्री जागीच ठार झाली. तर दोन पिल्ले जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच पिपल्स फॉर ॲनिमल ग्रुपच्या मुख्य सुनिता आयलानी यांनी शहर पोस्टेला माहिती दिली. तसेच घटनास्थळ गाठून चौकशी केली. यावेळी त्यांना प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली की, कार क्र. एमएच-28-एझेड-0318 चे चालक डॉ. पानझाडे रा. सावजी लेआउट हे घरासमोर गाडी लावतांना ही घटना घडली. यापूर्वीही 30 जून रोजी सुध्दा डॉ. पानझाडे यांच्या घरासमोर दोन कुत्र्याच्या पिल्लांना एका अज्ञात वाहनाने चिरडुन ठार केले होते. याप्रकरणी रविंदरसिंध पोपली यांच्या फिर्यादीवरून शहर पोस्टेमध्ये डॉ. पानझाडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मनोहर गोरे करीत आहेत.


Post a Comment