विद्यार्थी झाले विठ्ठल अन् वारकरी...
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये आषाढी एकादशी साजरी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन नवीन संकल्पना राबविणारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार येथे नर्सरी ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे संस्कार घडण्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ऍक्टिव्हिटी राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची वेशभूषा वारकऱ्यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून आषाढी एकादशी साजरी केली. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व्हावे हेच विद्यार्थी उद्या देशाचे उज्वल भविष्य आहेत त्या दृष्टिकोनातून दर शनिवारी सुद्धा मिशन एमपीएससी यूपीएससी च्या संदर्भात मागील 2024 च्या सत्र पासून शाळेने भविष्यात विद्यार्थी आयएएस आणि आयपीएस डीवायएसपी तहसीलदार इन्कम टॅक्स ऑफिसर जीएसटी ऑफिसर आय एफ एस असे नवीन नवीन अधिकारी निर्माण होण्यासाठी शाळेने पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांचा दर शनिवारी 100 मार्काचा सब्जेक्टिव्ह आणि एका शनिवारी ऑब्जेक्टिव्ह पेपर्स घेण्यात येतात. त्यामधून हे विद्यार्थी भविष्यात ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी उच्च पदावर विराजमान होती या हेतूने जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरने हा उपक्रम सुरू केलेला आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते दहावी पर्यंत नीट आणि जे डबल इ वर आधारित फाउंडेशन सुरू केले असून आपले विद्यार्थी नॅशनल लेव्हलच्या परीक्षा मध्ये कुठेच कमी पडू नये यासाठी शाळेने हा फाउंडेशन म्हणजेच नीट व जे डबल इ या परीक्षांची पूर्वतयारी सुरू करणारी संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. यामुळेपालकांचा ओढा जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरकडे दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी शाळेने विशिष्ट प्रकारे फाउंडेशन घेण्यासाठी नियोजन सुद्धा केले आहे त्यामुळे पालकांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी जिजाऊ स्कूल ऑफ कॉलर आवार येथे संपर्क करावा व आपल्या पाल्यांचे भवितव्य उज्वल करावे असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख नवनीत फुंडकर यांनी कळविली आहे

Post a Comment