छत्रपती संभाजी नगर च्या समितीने केले खामगाव बस स्थानकांचे निरीक्षण
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत खामगाव बस स्थानकांचे आज ५ ऑगस्ट२०२५ रोजी सकाळी 11 वाजता निरीक्षण करण्यात आले निरीक्षण समितीमध्ये संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख अनघा बारटक्के मॅडम , प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी सौ कोकाटे मैडम यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले.
![]() |
| जाहिरात |
याप्रसंगी विभागीय अभियंता (स्थापत्य) नाईक ,खामगाव आगार प्रमुख संजय अकोत , निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक सर तसेच प्रवासी मित्र मयुर श्रीकीसन शर्मा सुद्धा सहभागी होते . आगार प्रमुख संजय अकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने बस स्थानक परिसरात स्वच्छता वर भर दिला तसेच त्यांनी बस स्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्माण केले या गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारचे पौधा रोपण केले तसेच गुलाब पुष्प चे रोप सुद्धा लावण्यात आले
आज निरीक्षण समिती मधील अनघा बारटक्के मॅडम , सौ कोकाटे मॅडम यांच्या हस्ते फीत कापून गार्डनचे उद्घाटन सुद्धा केले याप्रसंगी निरीक्षक मॅडम यांनी आगर प्रमुख व त्यांचे चमुचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. यावेळी एका छोटे खाणी कार्यक्रमांतर्गत निरीक्षण समिती चे स्वागत व सत्कार करण्यात आले.यापूर्वी निरीक्षण समिती यांनी शेगाव येथील बसेस स्थानकांचा निरीक्षण करून खामगाव बसे स्थानकाचे निरीक्षण केले.
![]() |
| जाहिरात |
तसेच वेळ अभावी निरीक्षण समिती अकोला मुर्तीजापुर आणि कारंजा साठी रवाना झाली. निरीक्षण कार्यासाठी खामगाव आगार येथील सहाय्यक वाहतूक अधिकारी कु स्वाती तांबटकर , आगार लेखाकार मंगेश ठाकरे , वाहतूक निरीक्षक मोहिनी पाटील , सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे , वरिष्ठ लिपिक संगीता वनारे , वाहतूक नियंत्रक गजानन सोनोने , सैय्यद अनीस सैय्यद हसन , यांनी परिश्रम घेतले तसेच श्री साई राम ग्रुप चे अध्यक्ष मयूर शर्मा , बंटी मोरजानी आणि गणेश चौकसे यांनी निरीक्षण समितीचे सत्कार केले .संचालन व प्रस्तावना गजानन सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन मोहिनी पाटील यांनी केले




إرسال تعليق