खामगाव येथून बेपत्ता असलेल्या भुतडा यांचा मृतदेह धानोरा येथील विहिरीत आढळला: मृतकाचे हातपाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त
मलकापूर (जनोपचार न्यूज नेटवर्क) खामगाव येथील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या घनश्याम रमेशचंद्र भुतडा यांचा मृतदेह आज खामगाव मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रथमदर्शनी घाटपात असल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.
२ ऑगस्ट पासून बेपत्ता असलेले घनश्याम रमेशचंद्र भुतडा यांचा मृतदेह आज ५ ऑगस्ट रोजी धानोरा शिवारातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतदेह हा हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने ही आत्महत्या नसून घातपातच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
![]() |
| जाहिरात |
आज सकाळच्या सुमारास धानोरा शिवारातील काही शेतकरी शेतात कामासाठी जात असताना, नांदुरा मलकापूर महामार्गावरील धानोरा शिवारात असलेल्या एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मृत इसमाचे दोन्ही हात व पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने मलकापूर ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली.
![]() |
| जाहिरात |
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवला. मृताची ओळख पटवण्यात आली असून तो खामगाव येथील रहिवासी घनश्याम रमेशचंद्र भूतडा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ते खामगाव एमआयडीसी येथील बाबा इंडस्ट्रीज मध्ये वास्तव्यास तर हरेकष्णया फॅक्टरी कार्यरत असल्याची माहिती मिळाली. घनश्याम रमेशचंद्र भूतडा २ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद खामगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान मलकापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे.



إرسال تعليق