सामाजिक कार्यकर्ते नंदलाल भट्टड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम 

👉शेवपेटी व मेडिकल एड बँक साहित्याचा लोकार्पण 👉सामाजिक उपक्रम👉 सामान्य रुग्णालयात फळ वाटप 👉शुगर रुग्णांसाठी ग्लुकोमीटर 👉गाईंना चारा वितरण 👉आश्रम शाळेतील मुलांना खाऊ वाटप


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : येथील सामाजिक कार्यकर्ते व मदतकार्यात सदैव अग्रेसर असणारे नंदलाल भट्टड यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 13 ऑगस्ट रोजी शवपेटी व मेडिकल बँक च्या लोकार्पणासह खामगावात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वाढदिवसानिमित्त श्रीराम खेलदार यांच्यातर्फे खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात बिस्किट व फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्नदान व अक्षय हातेकर यांच्यातर्फे गाईंना चारा वाटप करण्यात येणार आहे. तसेच बंटी चौकशी यांच्यातर्फे येथील पारधी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व फळ वाटप करण्यात येणार आहे. शुगर च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे वेळोवेळी त्यांना रक्त तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते ही अडचण जाणून  101 रुग्णांना ग्लुकोमीटर वितरण करण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक शिव नवयुग जगदंबा उत्सव मंडळाच्या वतीने मेडिकल एड  बँके उद्घाटन करण्यात येणार आहे. शहरातील उद्योगपती रमेशचंद्र बिडवाणी यांच्या हस्ते मेडिकल एड बँकिंग उद्घाटन होणार आहे. या मेडिकल बँक मध्ये कुबडी खुर्ची पलंग अशा अनेक वस्तू गरजू रुग्णांना उपभोगासाठी देण्यात येणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post