दत्तगुरु मंडळाचा दहीहंडी उत्सव यंदा स्थगित
खामगाव :- शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव घाटपुरी नाका येथे होत असतो परंतु यावर्षी नामदार आकाश दादा फुंडकर यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या घाटपुरी नाका ते छोटे देवीपर्यंत रस्ता बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यामुळे अत्यंत उत्साहाने होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गोपाल भक्तांना इजा होऊ नये यामुळे १६ ऑगस्ट रोजी होणारा दहीहंडीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा करण्यात येणार असून सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन दत्तगुरु दहीहंडी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष यश (गोलू) आमले तसेचं उत्सव समिती प्रमुख शशांक वक्ते, धमसिंह बयास, अजय किरकाळे, किरण बोंबटकर, निलेश हांडके व इतर यांनी केले आहे.

Post a Comment