संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरामध्ये 163 जणांचे रक्तदान

          संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी  संत निरंकारी सत्संग भवन, खामगांव या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून  163 जणांनी रक्तदान केले आहे. शिबिराचा शुभारंभ खामगांव मुक्तेश्वर आश्रम चे मान्यवर मुक्तेश्वर कुलकर्णी जी तसेच सोबतच जिल्हा संयोजक संतोष जी शेगोकार ह्यांनी केले.

               संत निरंकारी मिशन च्या माध्यमातुन मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये - स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता असे अनेक जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येतात. आपण मानव आहोत रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुदंर संदेश देण्यात येतो.      रक्त संकलन जिल्हा शासकीय रूग्णालय खामगाव ब्लड बँक, अकोला जिल्हा शासकीय रूग्णालय ब्लड बँक यांच्या माध्यमातून करण्यात आले. 

            या शिबिरासाठी खामगाव मुखी अजयजी छतवानी ह्यांच्या देखरेखेखाली सेवादलच्या युनिट नं 689 चे संचालक, शिक्षक महात्मा तथा बहेनजी सोबतच युवकांचे व अन्य स्थानिक भक्त गणांचे मोलाचे सहकार्य लाभले. खामगांव तसेच आजुबाजूच्या परिसरातील युवकांनी भरभरून रक्तदान करून मानवतेच्या या महान यज्ञरूपी कार्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दर्शविले.



Post a Comment

أحدث أقدم