खामगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात
सामाजिक जाणीव यातून फोटोग्राफी व्हावी - ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे
खामगाव (नितेश मानकर)जनोपचार न्यूज नेटवर्क :: छायाचित्रकारांनी व्यावसायिक धर्म जपत असताना सामाजिक जाणिवांतील छायाचित्रे वृत्तपत्रांना देऊन समाजातील वास्तव समोर आणून समस्या सोडविण्याचे सामाजिक काम पण करावे काम करावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी केले. खामगाव फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक घाटपुरी येथील मंगल कार्यालयामध्ये आयोजित फोटोग्राफर मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
एका छायाचित्रात हजार शब्दांची ताकद असते असे सांगून अनेक छायाचित्रांनी सामाजिक चळवळींना बळ दिले तसेच समस्या सोडविण्यासाठी मदत केली आहे तेव्हा छायाचित्रकारांनी सामाजिक रुणाचा एक भाग म्हणून अशी छायाचित्रे टिपून प्रसिद्धीला द्यावी त्यामुळे नावाची प्रसिद्धी होईल आणि समाजातील समस्याही सुटतील आणि याची नोंद समाज घेईल असेही राजेश राजोरे म्हणाले.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी खामगाव फोटोग्राफर क्लबचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव महल्ले छायाचित्रकार विनोद चौधरी कुरा काकोडा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत देशमुख सचिन भाऊ भटकर शेगाव आणि ज्येष्ठ छायाचित्रकार योगेश शर्मा मलकापूर हे उपस्थित होते. यावेळी मैत्री सोहळ्याचे एक आयोजक विनोद चौधरी यांनी फोटोग्राफरच्या अळी अडचणी त्यांच्या भविष्याची चिंता तसेच काम करताना घ्यावयाची काळजी याबाबत सुंदर असे मार्गदर्शन केले छायाचित्रकाराने आपला मान सन्मान जपत सेवा द्यावी असे ही ते म्हणाले. तर प्रशांत देशमुख यांनी छायाचित्रकारांनी व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन केले. यावेळी योगेश शर्मा आणि अध्यक्ष पंजाबराव माले यांनी समायोजित भाषण केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि काही जुने कॅमेरे यांना पुष्पहार घालून वंदन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेगाव येथील गोपाल चोपडे यांनी केले तर उत्कृष्ट संचालन विवेक माहुरे यांनी व आभार प्रदर्शन संतोष डवले यांनी केले. कार्यक्रमाला खामगाव व परिसरातील तालुक्यातील शंभरच्या वर छायाचित्रकार उपस्थित होते सह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ताभाऊ सरोदे पंडित काठोळे, राहुल वसाळकर, सुरेंद्र देठे, गणेश सोसे, अंकुश बडगुजर, गौरव पांढरकर, अभी जगताप, पंकज भातुरकर, महेश ढोरे, गजानन सरोदे, आदींनी परिश्रम घेतले.





إرسال تعليق