सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा
वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी ‘ राष्ट्रीय क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिन भारताचे हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. त्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत आणि देशभक्ती ची भावना निर्माण व्हावी याप्रमाणे मेजर ध्यानचंद हे शिस्त, मेहनत आणि देशभक्तीचे प्रतीक आणि त्यांनी दाखवले की, साध्या पार्श्वभूमीतून येऊनही जग जिंकता येते. या उद्देशाप्रमाणे महाविद्यालयामध्ये ‘खेलेगा देश, खिलेगा देश’ हा कार्यक्रम खेळ स्पर्धा, फिटनेस मोहिम ज्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांना खेळ आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व समजावे म्हणून करण्यात आला.
![]() |
| जाहिरात |
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस हार फुले अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर महाविद्यालयाचे शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शरीर संपदा, आत्मविश्वास आणि संघ भावनेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर योगा, धावण्याच्या शर्यती ( 100 मीटर, 200 मीटर) , कबड्डी, खो–खो, रस्सीखेच, लिंबू चमचा, लगोरी असे अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 'Fit India' या कार्यक्रमाचे दिनांक 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व तसेच सर्व विद्यार्थ्यांना खेळामध्ये सहभागी कोणाचे आव्हान सुद्धा करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महाविद्यालयाचे शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर यांनी केले असून या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
![]() |
| Advt. |
हा कार्यक्रम यशस्वी सुरुवात व पुढील आयोजनाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री नामदार अँड. आकाश दादा फुंडकर यांनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.



Post a Comment