वनसंरक्षक संजीव गौड यांची पंचरत्न फार्म, हिवरखेड येथे सदिच्छा भेट
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- आज दिनांक 30/08/2025 रोजी मुख्य वनसंरक्षक श्री संजीव गौड साहेब यांनी हिवरखेड येथे "उद्यान पंडित" पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री दादाराव हटकर यांचे पंचरत्न फार्म, हिवरखेड येथे सदिच्छा भेट दिली.दादाराव हटकर यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची नोंद घेत कौतुक केले.तसेच केलेल्या बंदिस्त मेंढीपालन तसेच अंजन लागवड बद्दल आणि वन विभागाला केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढले.अंजन लागवड प्लॉट पूर्ण महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळत नाही करिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्लॉट च्या नोंदी घेण्यास सांगितले व संपूर्ण बंदिस्त मेंढीपालन तसेच मेंढपाळांसाठी वनविभागाने काय केले पाहिजे करिता चर्चा केली.यावेळी दादाराव हटकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी श्री संजीव गौड , प्रधान मुख्य वनसंरक्षक(PCCF),नागपूर ,सुमंत सोळंके साहेब,उप-वनसंरक्षक(DCF) बुलडाणा प्रादे ,डॉ.शिवाबाला साहेब, उप-वनसंरक्षक(DCF),वैभव काकडे साहेब,सहाय्यक वनसंरक्षक(ACF) बुलडाणा प्रादे ,स्वप्नील पवार,रेंज फॉरेस्ट ऑफिसर(RFO) खामगाव प्रादे ,मनोजकुमार आंग्रे,रेंज ऑफिसर(RO),प्रकाश जाधव,रेंज ऑफिसर(RO) ,सातव साहेब,रेंज ऑफिसर(RO),नागरे साहेब,रेंज ऑफिसर(RO),खोलगडे मेजर,वनरक्षक(FG),मिसाळकर मेजर,वनरक्षक(FG),जीवन बिलारी,वनरक्षक(FG),ज्ञानेश्वर शिंदे,वनरक्षक(FG) रवींद्र मोरे,वनरक्षक(FG) ,खेडकर,वनरक्षक(FG),सौरभ हटकर Phd (एडीनबर्ग), बाळू मार्कंड, रमेश हटकर,विनोद हटकर,अमोल हटकर, दिपक हटकर,महादेव हटकर,राहुल हटकर,भारत हटकर,कैलास हटकर,अर्जुन हटकर आणि इतर वन कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते.



إرسال تعليق