इंदौर चा बेपत्ता बालक 'यथार्थ' आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने पुन्हा परिवारात

दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना आढळले वरून रंजन तेलंग यांनी त्याची विचारपूस केली असता तो इंदौर येथील रहिवासी असल्याचे समजले .त्या बालकाला विश्वासात घेत रंजन तेलंग यांनी  इंदोर येथे पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला तेव्हा हा बालक बेपत्ता झाल्याने त्याच्या आईवडिलांनी हिरा नगर पोलीस स्टेशन ला गुन्हा क्र 0465/2025 कलम 137 BNS नुसार दाखल असल्याचे समजले. नंतर पूर्ण माहिती घेऊन रंजन तेलंग यांनी विधिवत कार्यवाही करून त्या बालक यथार्थ ला बाल कल्याण समिती अकोला यांना सुपूर्द केले, तोपर्यंत यथार्थ चे नातेवाईक सुद्धा तेथे पोहचले त्यानंतर बालकल्याण समिती च्या सदस्या श्रीमती प्रांजली जैस्वाल मॅडम यांनी प्रक्रिया पूर्ण करून यथार्थ ला त्यांच्या ताब्यात दिले , रंजन तेलंग यांनी जेव्हा विडिओ कॉल वर यथार्थ च्या आईला कॉल केला तेव्हा त्याच्या आईने मुलाला बघून रडत एकच हंबरडा फोडला मात्र रंजन तेलंग यांनी त्यांचा यथार्थ त्यांच्या जवळ सुरक्षित असल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या आई वडीलाने  रंजन तेलंग तसेच आरपीएफ विभागाचे खूप खूप आभार मानले

Post a Comment

أحدث أقدم