20 ते 23 दिवसाआड शहराला होत आहे पाणीपुरवठा:  शहरवासीयांचे हाल: पालकमंत्र्यांसह वरीष्ठांकडे तक्रार करणार - माजी आ. सानंदा

 खामगाव ः  पावसाळयाचे दिवस सुरु असतांना खामगाव शहराला पाणी पुरवठा करणारे ज्ञानगंगा प्रकल्प हे 100 टक्के भरलेले आहे. असे असतांना सुध्दा खामगाव नगर पालीकेच्या ढिसाळ नियोजनामुळे खामगाव शहर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. हिंदु धमयाचे गणपती- महालक्ष्मी या सारखे महत्वाचे सण उत्सव साजरे होत असतांना सुध्दा नागरीकांना 20 ते 23 दिवसाआड नळाद्वारे पाणी दिले जात असल्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. नियमित पाणी पटट्ी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरीकांमध्ये नगर पालीका प्रशासनाविरोधात  तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील महायुती सरकारची बदनामी होत आहे.नगर पालीका प्रशासनाने पाणी प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा खामगाव नगर पालीकेच्या या गलथान कारभाराविरोधात बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह सर्व वरीष्ठांकडे तक्रार करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला आहे.

सानंदा यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,खामगाव शहराला घाटपुरी नाका  व वामन नगर भागातील   टाकीवरुन पाणी पुरवठा होत असतो. परंतू गेल्या काही दिवसांपासुन घाटपुरी नाका भागातील खामगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन वारंवार नादुरुस्त होत आहे.त्यामुळे घाटपुरी टाकी वरुन पाणी पुरवठा होणाऱ्या भागांमध्ये नागरीकांना 20 ते 23 दिवसाआड पाणी दिले जात आहे तर वामन नगर टाकीवरुन 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे पावसाळयाच्या दिवसातही नागरीकांचे पाण्याविना हाल होत आहे. पाणी पुरवठा खंडीत होत असल्यामुळे खाजगी टँकरचालकांकडून  चढया भावाने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरीकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेे.  सणासुदीच्या दिवसामध्ये भरपुर पाण्याची गरज भासते,याचा नगर पालीका प्रशासनाने विचार करणे गरजेचे असतांना नगर पालीकेचे मुख्याधिकारी मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहरातील अनेक अंतर्गत जलवाहिन्यांना ठिक-ठिकाणी गळती लागली आहे शिवाय शहरात अनेक भागांमध्ये अनाधिकृत नळ जोडणींचे प्रमाणे दिवसेंनदिवस वाढत आहे.याबाबत सर्वकाही माहिती असुनही नगर पालीका प्रशासन मात्र गप्प आहे. 

एकीकडे नगर पालीकेचे मुख्य प्रशासक प्रशांत शेळके शहरामध्ये कोटयावधी रुपयांचा विकास केल्याची गप्पा मारतात तर दुसरीकडे शहरवासीयांना 23 दिवस पर्यंत पाण्यापासुन वंचित ठेवुन कर्तव्यात कसुर करत आहे. असा टोलाही सानंदा यांनी लगावला आहे.पाणी टंचाई निर्माण झाल्याने शहरवासीयांचे हाल होत आहे. मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी शहरवासीयांचा सहनशीलतेचा अधिक अंत न पाहता पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालुन खामगाव शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्द स्तरावर प्रयत्न करावे अन्यथा नागरीकांना वेठीस धरणाऱ्या मुख्य प्रशासनाकांना त्यांची जागा दाखविली जाईल असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला .

Post a Comment

أحدث أقدم