रविवारी हिवरखेड येथे शेतकरी शेतमजूर हक्क सभा

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू करणार मार्गदर्शन


खामगाव (जनोपचार नेटवर्क):-शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे अद्यापही दुर्लक्ष होतं असल्याने रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी हिवरखेड येथे भव्य शेतकरी शेतमजूर हक्क सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रहार नेते तथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज बुलंद करणारे प्रहार नेते बच्चुभाऊ कडू हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. कर्जमुक्ती सभा संध्याकाळी ६ वाजता बिंद्राबन बाबा मंदिरासमोरिल भव्य मैदानावर होणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व आंदोलने या विषयावर बच्चुभाऊ कडू आपले परखड मत व्यक्त करणार असून पंचक्रोशीतील शेतकरी शेतमजूर बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे असे आव्हान संयोजक गजानन लोखंडकर व आयोजक सागर मनोहरराव फुंडकर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم