सार्वजनिक गणपती मंडळाचे राष्ट्रवादी कडून स्वागत.......
जगाच्या पोशिंद्याला सुख समृद्धी लाभो-संजय बगाडे
खामगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क )मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून खामगाव मध्येही मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाने गणपतीची स्थापना केली असून स्थापना वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सार्वजनिक गणपती मंडळ चे स्वागत करण्यात आले .गणपती च्या मूर्तीला हात घालून मंडळाच्या अध्यक्षाचे ही स्वागत करण्यात आले. खामगाव शहरात स्थापन झालेल्या गणपती मंडळाचे स्वागत करते वेळी गणरायाची पूजा अर्जना करून जगाचा पोशिंदा म्हणजेच माझा शेतकरी सुख समृद्ध होवो असे साकळे गणराया ला टाकण्यात आले आहे त्यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे,तालुका प्रमुख संजय बगाडे,राष्ट्रवादी नेते अमोल बिचारे सह राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

إرسال تعليق