सावन स्पेशल आनंद मेळा, खरेदी, स्वाद आणि भरपूर आनंद
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - खामगांव येथील समाजसेवा संस्था मधील लिनेस क्लब खामगांव आणि जेसीआय खामगांव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ व ४ ऑगष्ट २०२५ रोजी सावन स्पेशल आनंद मेळा या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा रंगतदार आणि सर्जनशील व्यापार मेळा स्थानिक टिळक स्मारक मंदीर, नगर परिषद शाळा क्र. ६ जवळ संपन्न होणार आहे.
यो मेळ्यात विविध शहरातून आलेले व्यापारी आपल्या दर्जेदार उत्पादने आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह ग्राहकांचे स्वागत करणार आहे. सावन आला.. आनंद घेवुन आला, चला आनंद मेळ्यात करू या खरेदीचा जल्लोष... स्वाद घेवुया चटपटीत पदार्थांचा.. आणि भरूया आपल्या आठवणींच्या टोपलीत आनंदाचा मसाला. लकी कुपन घ्या, नशिब आजमवा आणि मिळवा बहुमुल्य बक्षिस कोण जाणे, पुढचा विजेता तुम्हीस असाल. यावेळी वेशभुषेसह देशभक्तीपर गितांची स्पर्धा ठेवली आहे. सर्व खामगांवकर नागरीकांना आवाहन करण्यात येते की, एकदातरी या आनंदमेळ्याला अवश्य भेट द्या व आपल्या उपस्थितीने आयोजकांचे मनोबल वाढेल आणि आपणास एक संस्मरणीय अनुभव मिळेल, अशी माहिती लिनेस क्लबचे अध्यक्षा लि. उर्मिला केला यांनी दिली आहे.
दि. ०१.०८.२०२५

Post a Comment