वारे नगरसेवक.... रक्षण करायचं सोडून हे काय कृत्य करतोय!
घनोकार याच्याविरुद्ध नांदुरा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा
नांदुरा: येथील एका माजी नगरसेवकाने मलकापूर रोडवरील एका ४२वर्षीय महिलेचा पाठलाग करीत तिच्या घरात घुसून शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केल्याची घटना 30 जुलै च्या संध्याकाळी ५ वाजे दरम्यान घडली .
याबाबत ४२ वर्षीय पीडित महिलेने नांदुरा पो स्टे गाठून दिलेल्या कैफियत मध्ये नमूद केले आहे की मी आरोपी नगरसेवक अजय सिताराम घनोकार रा नांदुरा याच्याकडून सात वर्षांपूर्वी दुकानाचा गाडा विकत घेतला होता. तेव्हापासून आरोपी हा माझा पाठलाग करीत असतो तो माझा दूरचा नातेवाईक असल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते मात्र ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान मी आईच्या घराकडे जात असताना वार्ड क्रं २ समोरील मंदिरासमोर गेले होते तेव्हा आरोपी माझ्याकडे पाहत असताना दिसला, त्यावेळी मी त्याला म्हटले की तू माझा पाठलाग का करीत असतो तु काल माझ्या घराच्या समोर काय टाकले तेव्हा आरोपी मला म्हणाला की मी तुझा पाठलाग करीन मी नांदुऱ्याचा लीडर आहे मी काहीही करू शकतो असे म्हणून मला शिवीगाळ केली तेव्हा मी त्याच्यासोबत काहीही वाद न करता घरी निघून आले नंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजे दरम्यान मी घरी एकटीच हजर असताना आरोपी अजय घनोकार हा माझ्या घरात येऊन माझा वाईट उद्देशाने हात पकडल्याने मी घाबरून त्याच्या हाताला झटका देऊन बाहेर आले तेव्हा आरोपीने मला शिवीगाळ करीत तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन तेथून पळून गेला या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी अजय घनोकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४,७८(१),३३३,३५२,३५१(२),३५१(३) अन्वये गुन्हे दाखल केले असून या विनयभंग प्रकरणाचा पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे मॅडम करीत आहेत

Post a Comment