महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक श्रीमती सु.रा मोहता महिला महाविद्यालयात खेळ व शारीरिक शिक्षण विभागातर्फे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस विविध खेळ स्पर्धा द्वारे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. हेमा जवंजाळ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यारपण केले. प्रा. डॉ. सीमा देशमुख यांनी मेजर ध्यानचंद ज्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला प्राचार्यांनी सुद्धा आपल्या भाषणात खेळाचे महत्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना त्यांची शारीरिक कार्यक्षमता वाढावी म्हणून पूरक व्यायाम प्रकार यांची माहिती देऊन विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आले. तसेच योगाभ्यासाचे महत्त्व कुमारी काकड हिने योगा प्रात्यक्षिक करून दाखविले .कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थीनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


إرسال تعليق