शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीला निवेदन:दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : पिंप्री गवळी येथील वरलोड ठिकाणी अतिरिक्त डीपी व नादुरुस्त डीपी दुरुस्त करण्याची मागणी त्यामध्ये तलाव शिवारातील काळे व देशमुख यांचे शेतातील डीपी वरलोड,गावठाण डीपी मेंटनस अभावी होल्टेज मिळत नाही,केन,राठोड, मेन्टेनन्स असल्यामुळे विजेचा लपंडाव राहतो.
पिंप्री गवळी धरणा जवळील काळे देशमुख डीपी ट्रान्सफॉर्मर वर पंचवीस ते तीस कनेक्शन असल्यामुळे टिकणे शक्य नाही करिता लवकरात लवकर नकाशा सर्वे इस्टिमेट सादर करून १०० kv चा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करून द्यावा,तसेच पिंप्री गवळी येथील गावठाणला असलेली डीपी नादुरुस्त असल्यामुळे होल्टेज अत्यंत कमी असल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो वारंवार महावितरण सांगून सुद्धा अद्याप पर्यंत काम झाले नाही,तसेच एक वर्षापासून अनंतराव केने यांच्या शेतातील डीपी वरील तार वादळी वारसा पडलेल्या पावसामुळे पडले होते परंतु महावितरण कंपनीने तार जोडणी न करता तारच काढून घेऊन गेले एक वर्ष उलटून गेले पण अध्याप पर्यंत तार जोडण्यात आले नाही,तसेच डीपी सुद्धा ना दुरुस्त आहे.
त्यामुळे बाजूला असलेल्या राठोड डीपी वरती मोठ्या प्रमाणात कनेक्शन जोडण्यात आले असून राठोड डीपी सुद्धा सद्यस्थितीत नादुरुस्त आहे. महावितरण ला वारंवार सांगून अद्याप पर्यंत मेंटेनेस करण्यात आलेले नाही, तसेच शहापूर येथील मेतकर डीपी तसेच कारेगाव हिंगणा भालेगाव,कुंभेफळ यांचे सह काही गावात वडलोट डिप्यावरती अडिशनल डीपी देण्याची मागणी केलेली आहे.
अद्याप पर्यंत मागणीची पूर्तता झाली नाही जिल्हा नियोजन मधून डीपी ट्रांसफार्मर मंजूर करण्याकरिता केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार मा.ना प्रतापराव जाधव साहेब यांचे पत्र लावलेले आहे.
तरीसुद्धा अद्याप पर्यंत डी पी मंजूर झालेल्या नाहीत करिता त्याची सुद्धा पाठपुरावा करून लवकरात लवकर माहिती देण्यात यावी जेणेकरून आम्ही मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करून डीपी ट्रांसफार्मर मंजूर करून असे निवेदन देण्यात आले निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे, उपशहर प्रमुख आनंद सारसर,शिवसेना उपशहरप्रमुख भाऊ बिडकर,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख,अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,शिवसेना शाखाप्रमुख शंकर देशमुख,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, शिवसेनेचे गोपाल जगताप, विभागप्रमुख ओम देशमुख, सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख नरेंद्र गावंडे, सोशल मीडियाचे फैजल, यांचे सह डीपी ची मागणी असलेले शेतकरी त्यामध्ये सहदेव पिंपळकर,मनोहर काळे,गोवर्धन वरुडकर, नंदकिशोर कोरडे,भगवान बर्डे,भानुदास वांईदेशकर, पुंडलिक इंगळे गजानन होगे,तुळशीराम फुंडकर,भास्कर गासे,विकास मानिकराव देशमुख, मानिकराव देशमुख, गजानन नारायण डवंगे,पुरुषोत्तम राजाराम हाडोळे,अनंता महादेव शामसुंदर,शालीग्राम पुराने,गोपाल गणपत लोखंडे,रवींद्र वीजय काळे,दरुबाई सुपाजी डोंगरे,चंद्रभान काटोने,रामभवनसिह सुरतसिंह ठाकुर,शेख रशीद शेख कासम शेख खलील,शेख अब्बास,शेख युसुफ शेख महबुब सागरसिंह हनुमानसिंह पवार,संतोष मोहन वरुळकार,किशोर मनोहर काळे नितीत सगेसे,आदींची मागणी आहे.


إرسال تعليق