शासकीय कार्यक्रमात एसडीओ पुरी यांच्या हस्ते एनसीसी कॅडेट्सचा सत्कार

खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या मध्ये श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी तहसीलदार सुनील पाटील, नगर परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ प्रशांत शेळके, निवासी नायबतहसीलदार सोनाली  भाजीभाकरे, नायबतहसीलदार महसूल निखिल पाटील, निवडणूक नायबतहसीलदार अभिजित जोशी, नायबतहसीलदार उपविभागीय अधिकारी विजय पाटील, नायबतहसीलदार संजय गांधी योजना शिरिष वसावे, एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे समाजातील गणमान्य व्यक्ती, पत्रकार बांधव उपस्थित होते.



अमरावती येथे  कमांडींग ऑफिसर ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात नुकताच संपन्न झालेल्या कम्बाईंन्ड एन्युएल ट्रेनिंग कॅम्प मध्ये श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयातील सात कॅडेट्स ना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सुवर्णपदक व रोप्य पदक प्राप्त झाले.यामध्ये प्राची खंडारे व शौर्य गावंडे फायरींग मध्ये सुवर्ण पदक, रिया मोरे स्पिच मध्ये सुवर्ण पदक, अनन्या गिते व सहर्ष इंगळे फायरींग मध्ये रौप्य पदक,सोहम देशमुख क्विज मध्ये रौप्य पदक, सानिया वैतकार हिने सोलो डान्स मध्ये सुवर्ण पदक तर सोलो सॉंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले.तसेच विद्यालयात सुध्दा ध्वजारोहण कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरराव बुराडे, सचिव महादेवराव भोजने, संचालक आश्विनभाई पाडलिया, प्राचार्य संतोष अंतरकर, प्रधानाचार्या सुषमा टिकले, उपप्राचार्य आनंद इंगळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे यांचे कॅसेट्स ला मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post