जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स गुंजकर ज्युनियर अँड सिनियर कॉलेज आवार मध्ये स्वतंत्र दिन साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : आज दिनांक. १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स गुंजकर ज्युनियर अँड सिनियर कॉलेज आवार मध्ये स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री.रामकृष्णजी गुंजकर सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले . यावेळी खामगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती श्री.वसंतजी बागल साहेब यांची प्रमुख उपस्थति होती. यानंतर प्रमुख अतिथी प्रसिद्ध उद्योगपती श्री.वसंतजी बागल यांचे स्वागत प्रा.श्री.गुंजकर सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर यांचे स्वागत ब्राम्हणे सर यांनी तसेच ,संस्थेचे सचिवा प्रा.सौ.गुंजकर मॅडम यांचे स्वागत शहाणे मॅडम यांनी केले तसेच सिनिअर अँड जुनियर कॉलेज चे प्राचार्य प्रा.श्री. सतीषजी रायबोले सर यांचे स्वागत हिवराळे सर यांनी केले तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.अल्हाट सर यांचे स्वागत जुमळे सर यांनी केले. तसेच आवार येथील सरपंच पती दिलीप गवई, उपसरपंच विश्वनात वैतकर, पोलीस पाटील संदीप खराबे, ग्रामपंच्यात सदस्य आनंद गवई, अरुण मांजरे, पुरुषोत्तम फुंडकर, प्रल्हाद सोळंके, देवचे साहेब ग्रामपंचायत सचिव यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मोरे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन सौ.तायडे मॅडम यांनी केले. तसेच स्वतंत्र दिना निमित्त शाळेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. तसेच आभार प्रदर्शन गावत्रे मॅडम यांनी केले. यावेळी सिनियर अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. सतीषजी रायबोले सर ,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संतोष अल्हाट सर तसेच सिनियर अँड ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सर्व शाळेचे बस मालक व चालक उपस्थित होते.

Post a Comment