मलकापूरच्या गोकुळधाम मध्ये नांदतेय आपुलकी..

हरिपाठ मंडळ करते प्रत्येकाचा वाढदिवस साजरा


मलकापूर: ग्रामीण भागातून आलेला प्रत्येक जन शहरात कॉलनीत वास्तव्य करतात. वेग वेगळ्या गावातून आलेली व्यक्ती त्या त्या परिसरात कुटुंबा प्रमाणे राहतात.याच आपुलकी व जिव्हाळ्यातून येथील गोकुळ धाम मधेही वेगवेगळ्या भागातून आलेले कुटुंब एकोप्याने राहतात.  अशी परिस्थिती तर सर्वीकडेच पहायला मिळते मात्र गोकुल धाम ने आपुलकी का जिव्हाळ्याच नेत निरंतक टिकून रहावा यासाठी वेगळाच पायंडा रचला.परिसरातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केली. आज भाडगनी येथून नव्यानेच वास्तव्यास आलेले विनोद हरीभाऊ व्यवहारे यांचा वाढदिवस संकट मोचन हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला.शेला टोपी नारळ व पेढा भरऊन वाढदिवस साजरा केला. या वेळी हरिपाठ गोकुळ धाम मंडळातील प्रतिष्ठित  नागरिक बराटे, टेकाडे, पवार, आढाव, मुके, पालवे ,गणेशकर, शुक्ला, पाटील ,तायडे यांच्यासह महाराज यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post