संत निरंकारी मिशन तर्फे भव्य रॅलीद्वारे रक्तदान शिबीर जनजागृती आयोजन
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, खामगांव ब्रँच तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि.17 ऑगस्ट रोजी-संत निरंकारी सत्संग भवन,घाटपुरी रोड, खामगांव येथे सकाळी ९ ते २ या वेळेत करण्यात आले आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर तसेच नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता सुद्धा करण्यात येते. आपण मानव आहोत. रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी नाते जोडू शकतो ह्याच उदात्त परोपकारी हेतूने संत निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे खामगाव मुखीजी तथा त्यांच्या सोबतच सर्व भक्तगण बंधु भगिनी या रक्तदान शिबिरासाठी जनजागृती करत असून "रक्तदान म्हणजे जीवनदान, वाचवी रुग्णांचे प्राण" या भावनेतून शेकडो निरंकारी भक्त रक्तदानासाठी पुढे येतात. रक्तदान ही सर्वांचीच जबाबदारी असुन या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे ह्यासाठी मिशनचे स्वयंसेवक आजुबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहेत. ह्याचाच भाग म्हणजे दिनांक १६ ऑगस्ट रोजी भव्य स्कूटर एवं बाईक रॅलीचे आयोजन सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती होऊन त्यांनी या मानव सेवेच्या महान कार्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment