डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल एक्सलेंस बिजनेस अवार्डने महाराजा मसालाचे संतोष डिडवाणी सन्मानित

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल एक्सलेंस बिजनेस अवार्डने खामगाव येथील महाराजा मसाला उद्योगचे मालक संतोष डिडवाणी यांना सन्मानित करण्यात आले. कन्नड च्या अभिनेत्री विजयालक्ष्मी यांच्याहस्ते हा सन्मान संतोष दिलवानिया यांना प्रदान करण्यात आला .

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये २० ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या नॅशनल लीडर्स समाजक कॉन्फरंन्समधील कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकल्याण मंत्री रामदास आठवले हे होते. तर मंचावर कन्नड अभिनेत्री विजयालक्ष्मी, महामंडलेश्वर डॉ. वैष्णवी या जगदंबा व महामंडलेश्वर होते.

जाहिरात

विशेष म्हणजे सामाजिक डीडवाणीया परिवाराचा मोठा सहभाग असतो. गेल्या शंभर वर्षापासून दूधवाणी या धर्मशाळा सलग सेवा देत आहे तर 54 वर्षापासून महाराजा मसाला उद्योग बुलढाणा जालना वाशिम रिसोड आधी जिल्ह्यात नंबर एक वर झडकत आहे. त्यांनी शिवशंभू ग्रुपच्या माध्यमातून जनुना तलाव परिसरात 25000 वृक्षारोपण केले आहे.जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव

Post a Comment

Previous Post Next Post