खामगाव: OBC मंडळ यात्रेच्या स्वागताने भारावून गेलो-राज राजपुरकर

राज राजपूत यांच्यासोबत यात्रेदरम्यान गहन चर्चा करताना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे व डॉक्टर तायडे

खामगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क )OBC च्या न्याय व हक्कासाठी लढाई लढण्यासाठी विदर्भातून निघालेल्या OBC मंडळ यात्रेचे जंगी स्वागत खामगाव तालुका राष्ट्रवादी च्या वतीने करण्यात आले.शेगाव वरून ही मंडळ यात्रा खामगाव मध्ये दाखल झाली सुरवातीला महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या यात्रेची खामगाव मध्ये जंगी रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ,महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत मंडळ यात्रेने खामगाव शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले.

 नागपूर वरून निघालेल्या या OBC मंडळ यात्रेचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी चे प्रवक्ता राष्ट्रवादी OBC सेल चे राज्य प्रमुख राज राजपुरकर हे होते त्यावेळी राष्ट्रवादी खामगाव तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मंडळ यात्रेसाठी घेतलेली मेहनत नक्कीच फळाला जाईल असे बोलत मंडळ यात्रेच्या स्वागताचे नियोजन बद्दल कौतुक केले इतकंच नाही तर ज्या पद्धतीने आपण सर्व OBC बांधवांनी एकजुट दाखवली तशीच एकजूट OBC च्या विरोधात जाणाऱ्यांना खाली खेचण्यासाठी दाखवा असे उद्गार काढले त्यावेळी खामगाव तालुका गटाखालील सर्वच OBC बंधू बहिणी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post