शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना शिवसेनेच्यावतीने अभिवादन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : शिवसेनेच्या वतीने शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र  अभिवादन करण्यात आले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी योद्धा, आपल्या लेखणीतून कष्टकऱ्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहचविणारे लोकशाहीर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर साता समुद्रापार जाऊन पोवाडा गाणारे सच्चे शिवशाहीर,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती.त्यांच्या साहित्यातून श्रमिक आणि वंचितांचा आवाज बुलंद झाला.अशा या थोर साहित्यिकाची  जयंती.यानिमित्त टेंभुर्णा, बाळापुर फैल,व खामगाव मधून निघालेल्या शोभायात्रे मध्ये सहभागी होऊन त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

जाहिरात

यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे,शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे,शिवसेना महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई भुजाडे,महिला आघाडी युवती शहर प्रमुख श्वेता ताई पाटील,अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर खंडारे,विभाग प्रमुख गोपाल शेळके,शाखाप्रमुख गोपाल चव्हाण,विभाग प्रमुख रुपेश तायडे,गौरव वाडेकर,ऋषिकेश बदरखे,गजानन पळसकार,विनायक घाटोळ, आदींसह मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष,पदाधिकारी सदस्य व शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माणणारा मोठा युवा वर्ग महिला व पुरुष मोठा संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post