ब्रह्माकुमारीजच्या रक्तदान महाअभियानाअंतर्गत खामगाव रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क)- ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी (२५ ऑगस्ट २०२५) व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी दि. २२, २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या अभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत ब्रह्माकुमारीस खामगाव येथील सेवा केंद्रावर 22 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित आहे यावेळी रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. हा पहिलाच प्रसंग आहे की एखाद्या आध्यात्मिक संस्थेमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान अभियान राबवले जात आहे.
खामगाव येथील स्थानिक सेवाकेंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम दि. 22 ऑगस्ट, 2025 शुक्रवार . ब्रह्माकुमारी सेंटर रायगड कॉलनी येथे सकाळी 10 वाजता राबविण्यात येणार असल्याची माहिती सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांनी दिली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Post a Comment