"साक्षी भोजने यांच्या कडून कावडधारकांचे स्वागत"
खामगांव -जनोपचार: स्थानिक माधव नगर नांदुरा रोड स्थित चौकात माजी जिल्हा संघचालक महादेवराव भोजने यांची नात भाजपा युवती मोर्चा सरचिटणीस साक्षी संजय भोजने यांच्या हस्ते खामगांवात येणाऱ्या कावडधारकांची आस्थेने चौकशी करून त्यांचे स्वागत केले.यावेळी महादेवराव भोजने यांनी कावडधारकांना भगवे शेला, टोपी घालून त्यांच्या सत्कार केला.
तसेच कावडधारकांना चहा,नाष्टा पाणी व प्रसाद वितरण करण्यात आले.यावेळी अभाविप च्या शाखा अध्यक्ष अस्मिता भोजने,माजी जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे,वैष्णवी जवळकार,अतुल चव्हाण,संकेत वानखडे,आनंद निकाळजे,संजय भोजने,ज्योती भोजने वेदांत भोजने, शुभम राक्षे,आनंद बोचरे, वृषभ चव्हाण, शुभम राठोड, अनंता गोंड,नीता गोंड,सृष्टी गोंड, उज्वल गव्हाड ,शिवाजी ठेंग,दिनेश ठेंग,सौ रक्ताळे, आदी उपस्थित होते.



Post a Comment